अर्थराष्ट्रसंचार कनेक्ट

पुण्यात ग्लोबल वेब ३ टॉक सिरीज

क्रिप्टोच्या सर्वच प्रश्नांचा उलगडा आता एकाच छताखाली

युनिफार्मबद्दल : युनिफार्म हे एक सहयोगी संपत्तीनिर्मिती प्लॅटफॉर्म आहे. जिथे विकेंद्रित वित्त म्हणजेच डीसेंट्रलार्इझ फायनान्स (DeFi) मधील सर्वोत्तम पर्याय गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी एकत्र येतात. ग्रुप स्टॅकिंग, आयडीओ लाँचपॅड आणि लिक्विडिटी पूल फार्मिंग देणाऱ्या सेवांच्या विविध श्रेणीसह युनिफार्म गुंतवणूकदारांना त्यांच्या परताव्यात वैविध्य आणून उच्च वार्षिक टक्केवारी उत्पन्न (एपीवाय) मिळवून देते.

पुणे : क्रिप्टोकरन्सीबद्दलच्या मिथकांचा पर्दाफाश करीत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य साधनांसह सक्षम करण्यासाठी युनिफार्मच्या वतीने ग्लोबल वेब ३ टॉक सिरीजच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन येरवडामधील ९१ स्प्रिंगबोर्ड या को-वर्किंग स्पेसमध्ये करण्यात आले होते.

जागतिक वेब ३ टॉक सिरीज ही युनिफार्मच्या जागतिक प्रसार कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्यामुळे स्टॅकिंग आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या इतर मार्गांवरून निष्क्रिय उत्पन्न निर्माण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करेल. सध्या देशातील क्रिप्टो बाजारपेठ विविध सुधारणांच्या टप्प्यातून जात आहे. गुंतवणूकदारांना त्यांचा क्रिप्टो पोर्टफोलिओ एका विशिष्ट टप्प्यात ठेवण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना क्रिप्टो मालमत्तेची खरी क्षमता वापरण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य देणे हे युनिफार्मचे उद्दिष्ट आहे.

दुसऱ्या सत्रात नामांकित उद्यम भांडवलदार, मार्केटिंग गुरू, क्रिप्टोबाबत उत्साही असे गुंतवणूकदार आणि इतर अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते. युनिफार्मच्या संस्थापक तरुषा मित्तल आणि मोहित मदन शहरातील गुंतवणूकदार समुदायाशी संवाद साधला.

गुंतवणूकदारांना वेब ३ च्या पूर्ण क्षमतेचा फायदा उठवण्यासाठी प्रबोधन करणे हे या चर्चा मालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुण्यातील पहिल्या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यासाठी ३५० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. त्यातील १२० पेक्षा जास्त गुंतवणूकदार होते. त्यांनी निष्क्रिय उत्पन्न निर्माण करण्याच्या ७ चॅनेलमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला.

सत्रात सहभागी झालेल्यांना क्रिप्टो विश्वाचा शोध घेण्यास सक्षम करणे. त्याच्याशी निगडित मिथकांना उलगडणे, स्टॅकिंग, एलपी स्टॅकिंग, लेंडिंग, लर्निंग टू अर्न, वॉक अशा विविध मार्गांचा वापर करून क्रिप्टो मालमत्ता गुंतवून निष्क्रिय उत्पन्न कसे मिळवायचे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. क्रिप्टोमधून येणारे उत्पन्नाविषयीदेखील माहिती दिली जार्इल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये